Home बीड तलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक

तलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240117_073219.jpg

तलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि:१६ डिसेंबर २०२४ तलाठी भरतीसाठी झालेली परीक्षा रद्द करा.अशी मागणी करत स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेकडो विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तलाठी भरतीसाठी नुकताच झालेला पेपर फुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान यावेळी भरती उमेदवारांची माहिती पब्लिक करण्यात यावी.२०२३ तसेच मागील २०१९ तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.या दोन्ही घोटाळ्याचा तपास पारदर्शक होण्यासाठी, उच्च न्यायालयातील निवृत्त अथवा सिटींग न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात यावी.चौकशी समितीत सायबर एक्सपर्ट,आयएएस, आयपीएस स्तरीय अधिकारी तसेच आमच्या विद्यार्थी प्रतिनिधीनींचा समावेश असावा.अशी ही मागणी केली आहे.

४५ दिवसाच्या आत परीक्षा घ्या.

२०२३ तलाठी भरतीचे अनेक परीक्षा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षेला काही अर्थ उरलेला नाही. त्यामुळे तलाठी भरती रद्द करण्यात यावी. तलाठी ची फेरपरीक्षा एमपीएससी मार्फत ४५ दिवसाच्या आत घेण्यात यावी.यापुढील सर्व परीक्षा सरळ सेवा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात.पेपर फुटी कायदा तात्काळ मंजूर करून लागू करण्यात यावा.पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ करण्यात यावी.या मागण्या यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत.यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here