Home जळगाव भंगार विक्रेत्याकडून चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भंगार विक्रेत्याकडून चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

347

आशाताई बच्छाव

IMG_20240116_203537.jpg

भंगार विक्रेत्याकडून चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- घराबाहेर खेळत असलेल्या 11 वर्षीय बालीकेला चॉकलेट खाण्यास देवून वडिलांना मारण्याची धमकी देवून भंगार खरेदी विक्री करणाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शहरात एका भागात घडली असून याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पीडित 11 वर्षीय बालिका घराबाहेर खेळत असतांना आरोपी असतांना भंगार विक्रेता असफाकखान रऊफखान याने बालीकेला चॉकलेट व 100 रूपये दिले. चाकलेट खाण्यास सांगून सांगितलेले चॉकलेट न खाल्ल्यास तुझ्या वडिलास मारून टाकेन अशी धमकी देवून बालिकेला एकाच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना दि.15 रोजी सायंकाळी 4.25 वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी असफाकखान रऊफ याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 376(अ)(ब),506, पो्नसो कायदा कलम 3,4(2)5(एम), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.

Previous articleपरळ ब्रिजवर भीषण अपघात! ट्रकला धडकल्याने दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेले तीघे ठार
Next articleचाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.