
आशाताई बच्छाव
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ परभणी येथे २ फरवरीला भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
महाराष्ट्र राज्यातील संपादक व पत्रकार व पोलीस प्रशासनाचा होणार विशेष सन्मान – गजेंद्र बांडे जिल्हा अध्यक्ष
परभणी:- (संजीव भांबोरे) जिल्ह्यातील दिल्ली क्राईम प्रेस महाराष्ट्र राज्य सदस्य व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे यांच्या हस्ते परभणी येथे लवकरच महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार पोलीस प्रशासन यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून यांची दक्षता पत्रकार व संपादक पोलीस प्रशासन यांनी घ्यावी तसेच भारतीय राज्यघटने नुसार संवैधानिक नियमानुसार पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाज हिताच्या दृष्टीने सदैव चांगल्याप्रकारे पत्रकार व संपादक पोलीस प्रशासन हे नेहमी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असुन समाजात होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार ,पोलीस प्रशासन ,संपादक बांधव आपल्या ज्ञानानुसार करत असतात .सदैव गोरगरीब जनतेला विश्वासपूर्वक मदत करून राज्यांत होणारा भ्रष्टाचार, अन्याय ,अत्याचार याला आळा घालून जनतेच रक्षण करण्यासाठी तत्पर असणारे पत्रकार, संपादक व पोलीस प्रशासन हे असून सदैव ते असेच कार्य करत राहतील त्या साठीच आपण परभणी जिल्हा येथे सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्यामूळे परभणी जिल्हा येथील उपस्थित मंडळी परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक , जिल्हाधिकारी परभणी ,ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन, वकील संघ तसेच ग्रामीण भागातील, शहारातील महाराष्ट्र राज्यातील सर्व संपादक व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मिडिया व प्रिंट मिडिया चे महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून जनतेची हाक ऐकणारे पत्रकार संपादक तसेच शासकीय पोलीस अधिकारी, यांचा देखील विशेष सन्मान परभणी जिल्ह्यांमध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे साहेब आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे .