Home भंडारा वंचित बहुजन आघाडी तर्फे पाच गावात संविधान सन्मान रॅलीला उत्तम प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडी तर्फे पाच गावात संविधान सन्मान रॅलीला उत्तम प्रतिसाद

59

आशाताई बच्छाव

IMG_20231225_064739.jpg

वंचित बहुजन आघाडी तर्फे पाच गावात संविधान सन्मान रॅलीला उत्तम प्रतिसाद

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )भारतीय संविधान जगातील लिखित सर्वात मोठे सर्वश्रेष्ठ असून काही संविधान विरोधी व्यक्ती संविधाना बदलविण्याची भाषा करत आहेत.
आपल्या संविधानाने सर्व समूहातील घटकांना अधिकार बहाल केले आहेत .
स्वातंत्र्य ,समता, बंधुता, व सामाजिक न्याय, यावर अवलंबून असून सर्व वंचीत घटकांना या भारतीय राज्य घटनेद्वारे त्यांची प्रगतीची दारे खुली झाली आहेत .जगात नंबर एक ची घटना असताना काही लोक घटना बदलण्याची भाषा करत आहेत.
भारतीय राज्यघटना कशी उत्तम आहे ? बहुजन समाजातील घटकांना कसे न्याय मिळवून देत आहे व प्रबोधन करण्याकरता वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा साकोली तर्फे 5 गावात सालई, बोलदे,वांगी, पळसगाव, महालगाव, इत्यादि गावात संविधान के सन्मान मे वंचीत बहुजन आघाडी मैदान मे हा उपक्रम घेऊन भंडारा जिल्हा प्रभारी भगवान भोंडे, भंडारा संघटक जिल्हा संघटक डी जी रंगारी, महीला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या नेतृत्त्वात रैली करण्यात आली व प्रत्येक ठिकाणी संविधान विसई प्रबोधन
भंडारा जिल्ह्यातील प्रभारी भगवान भोंडे ,जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे ,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका संघटक प्रषिक मोटघरे, रेखा रामटेके यांनी रैली ला मार्गदर्शन करीत आहेत
पाचही गावात उत्तम प्रतिसाद मिळाला
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका अध्यक्ष रंगारी ,तालुका संघटक प्रक्षिक मोटघरे, रेखा रामटेके, त्रिवेणी मेश्राम, यांनी परिश्र घेतले
तसेच रैली चा समारोप महालगाव येथे करण्यात आले .प्रास्ताविक तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी ,
संचालन तालुका संघटक प्रशिक मोटघरे तर आभार रेखा रामटेके यांनी मानले.

Previous articleमानव सेवा मंडळा कडून गरजूंना ब्लँकेट वाटप व ज्येष्ठांचा सत्कार
Next articleकटकवार विद्यालयात टाकावू पासून टिकावू उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.