Home अमरावती अमरावतीत खासदारांचे निलंबन विरोधात इंडिया आघाडीचे निदर्शने.

अमरावतीत खासदारांचे निलंबन विरोधात इंडिया आघाडीचे निदर्शने.

109

आशाताई बच्छाव

IMG_20231224_070036.jpg

अमरावतीत खासदारांचे निलंबन विरोधात इंडिया आघाडीचे निदर्शने.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती: लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या तब्बल १४६ खासदारांना निलंबित केल्याबद्दल इंडिया आघाडीने अमरावती येथील राजकमल चौकात शुक्रवारी केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने आंदोलन केले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना(उबठा) आम आदमी पक्ष यांनी प्रिय निषेध केला. यावेळी आंदोलनात तुकाराम भस्मे, मिलिंद चिमटे, अशोक सोनारकर, सुभाष पांडे, काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश सचिव भैया पवार, अभिनंदन पेंडारी, माजी महापौर मिलिंद चिमटे, वैभव देशमुख, निळकंठ ढोके, सुरेश सोनुले, ओमप्रकाश कुटेमाटे, सुधीर देशमुख, रेहाना यास्मिन, संजय बोबडे, किशोर खोब्रागडे आधी सहभागी झाले होते.