
आशाताई बच्छाव
स्वराज्य पोलिस मित्र संघटना मुंबईत विश्वस्त योगेश पाटील सरांचा वाढदिवस वेगवेगळया ठिकाणी साजरा
सविता तावरे मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर- आज १२ डिसेंबर, 2023 रोजी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव श्री योगेश पाटीलसर यांच्या वाढदिवसानिमित्त आज स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना मुंबईच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संचालक तथा मुंबई अध्यक्षा सविताताई तावरे यांनी असल्फा येथे , मुंबई विभाग उपाध्यक्षा सविताताई चाकणे यांनी घाटकोपर येथे, मुंबई विभाग संघटक वैशालीताई कांबळे यांनी चेंबूर येथे तर मानखुर्द सहसचिव संध्याराणी बिरादर यांनी मानखुर्द येथे तर घाटकोपर कार्याध्यक्ष सिद्धार्थ गज्जेली यांनी शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप केले.