
आशाताई बच्छाव
महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघ जाहीर
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )चेन्नई (तामिळनाडू) येथे वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले यांनी महिला व पुरुषांचा महाराष्ट्र संघ जाहीर केला आहे. पुरुष संघाच्या कर्णधारपदी सर्वेश मेन आणि महिला संघाच्या कर्णधारपदी प्राची चटप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र संघ : पुरुष गट- सर्वेश मेन (कर्णधार), सुनील पांडे, हर्ष काकडे, सौरभ ताजने, सुमित मुंढरे, रोहित नवले, स्वप्निल महाजन, रोहन भुसनार, रोहन काळे, ऋषिकेश अंबुसकर, शिवशंकर नागपुरे, सौरभ शिंदे. प्रशिक्षक-जय कवीश्वर, व्यवस्थापक-प्रवीण वहाले यांचा समावेश आहे तर महाराष्ट्र संघ महिला गट प्राची चटप (कर्णधार), शिल्पा डोंगरे, प्रीती शिंदे, अनुजा लोंढे, उर्वशी गुप्ता, श्रुती कडव, अनुराधा मोरे, मिताली गणवीर, अपेक्षा सपुते, नेहा कांगटे, गायत्री इवरकर, वंशिका कांबळे, प्रशिक्षक- साधना धुर्वे, व्यवस्थापक-पूनम कोकाटे यांचा समावेश आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आट्यापाट्या संघाचे मुख्य डॉ. दीपक कविश्वर, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महाराष्ट्र राज्य महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले, भंडारा आट्यापाट्या संघाचे प्रशिक्षक श्याम देशमुख इत्यादींनी विजयी चमुंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.