आशाताई बच्छाव
कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार. येथे ‘ग्रामस्वच्छता अभियान.’
मयुर खापरे चादुंर बाजार
दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘महात्मा गांधी ‘ यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसर झाडून स्वच्छ केला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वनिता चोरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल वैद्य, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मीना वैध, सर्व प्राध्यापक वृंद व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रासेयो चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.