Home भंडारा नागपूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची बैठक संपन्न

नागपूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची बैठक संपन्न

94

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-181105_WhatsApp.jpg

नागपूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची बैठक संपन्न

भंडारा जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले नियुक्तीपत्र

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा. प्रदेशाध्यक्ष खा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष मा. गजू नाना शेलार, प्रदेश महासचिव मा. डॉ. भूषणजी कर्डिले, प्रदेश सहसचिव मा. बळवंतराव मोरघडे, प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडी अतुल वांदीले, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. चरण वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशजी देवतळे, प्रदेश पदाधिकारी जयेश बागडे यांच्या उपस्थितीत समाज बळकट करण्याकरिता आणि महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी व भंडारा जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात दिनांक २८/१०/२०२३ रोज शनिवारला जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाइन, रवि नगर चौक, नागपूर येथे नागपूर विभागाची विभागीय महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची बैठक पार पडली.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा. प्रदेशाध्यक्ष खा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष मा. गजू नाना शेलार, प्रदेश महासचिव मा. डॉ. भूषणजी कर्डिले, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य,
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यातील उपस्थित पदाधिकाऱ्यांना श्री शत्रुघन लीचडे प्रसिद्ध प्रमुख, श्री दिनेश लांजेवार उपाध्यक्ष श्री सुशील दिवटे संघटक, अमित वाघमारे तालुकाध्यक्ष ,ओमकार शेंद्रे कोषाध्यक्ष, गजानन मेहर महासचिव,भुमेश जूमले तालुका उपाध्यक्ष, अभिषेक लेंडे तालुका सचिव, गुलाब बारई तालुका कार्याध्यक्ष, अशा विविध पदांवर नियुक्त करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. हे विशेष.

Previous articleमहाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्या संघटनामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन
Next articleदेगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषणासाठी बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.