आशाताई बच्छाव
इम्तियाज अत्तार (नाशिक रोड प्रतिनिधी)
आज दिनांक १९/१०/२०२३ रोजी नाशिक जिल्हा येथे आलेल्या मा ना डॉ निलिमा ताई गोह्रे (उप सभापती महाराष्ट्र विधान परिषद) यांना भेटून नाशिक जिल्हा रुग्णालयातील सिव्हील कॅन्टीन हि अनाधिकृत असून वारंवार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक महानगरपालिका नगर रचना विभाग, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय यांना निवेदन देण्यात आले होते परंतु आज पर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही या आशयाचे निवेदन देण्यात आले असून सिव्हील कॅन्टीन हि अनाधिकृत आहे हे लवकरच काढण्यात येईल मात्र आजही सदर कॅन्टीन राजरोस पणे शासकीय रुग्णालय आवाराची भिंत फोडून चालू आहे शासकीय जागेत कोणताही व्यवसाय करण्यास शासनाने बंदी घातली असतानाही हि कॅन्टीन कोणाच्या आशिर्वादाने सूरू आहे कारण येथे दिवसभर रूग्ण ये-जा करतात आणि अस्वच्छते मुळे रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ शकतो व आजार बळाऊ शकतो हे माहीत असूनही जिल्हा रुग्णालयातील अधिकारी सपशेल मुद्दाम डोळेझाक करताना दिसत आहे यांना कसलाही फरक पडत नाही हि शोकांतिका आहे इतकी वर्षे हि कॅन्टीन अनाधिकृत आहे हे माहीत असूनही जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी कार्यवाही करत नसल्याची तक्रार आज निवेदनाव्दारे करण्यात आली असून आता तरी शासन दरबारी न्याय होतो की नाही हे बघावे लागेल या प्रसंगी युवा मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री तौफिक भाऊ अत्तार, युवा मराठा वृत्तपत्रात नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार, फरिद( मामु) अत्तार तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते






