Home जळगाव चाळीसगावात 51 हजाराचा गुटखा जप्त

चाळीसगावात 51 हजाराचा गुटखा जप्त

206

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-071926_Google.jpg

चाळीसगावात 51 हजाराचा गुटखा जप्त

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – प्रतिबंधीत गुटख्याची दुचाकीवरून अवैध वाहतुक करणाऱ्या दोघांना 21 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव ते वाघळी दरम्यान बोरखेडा गावाच्या अलीकडे एका हॉटेलसमोर चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी पकडले असून. त्यांच्याकडून मोटारसायकल सह गुटखा असा 80 हजार 720 रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहीती अशी की संशयित अन्सारी सईद अहमद (34) रा. जाफरनगर, बिस्मिल्ला हॉटेलच्या पाठीमागे, मालेगाव व शेख इरफान शेख युनुस (39) रा. सायगाव ता. चाळीसगाव हे एमएच.15 डीएन.1126 या दुचाकीवरून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य सुगंधीत पान मसाल्याची अवैध वाहतुक करतांना चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळून आले. त्यांच्याकडून सुमारे 50 हजार 720 रूपये किमतीचा विमल कंपनीचा गुटखा व 30 हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा 80 हजार 720 रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी हवालदार शांताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अन्सारी सईद अहमद व शेख इरफान शेख युनुस या दोघांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.

Previous articleसातलवाडा येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
Next articleमराठा आरक्षण आणि आंदोलनाची दिशा व दशा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.