Home जळगाव चाळीसगावात तिघांकडून बांधकामाच्या लोखंडी प्लेटा जप्त

चाळीसगावात तिघांकडून बांधकामाच्या लोखंडी प्लेटा जप्त

128
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-212909_Google.jpg

चाळीसगावात तिघांकडून बांधकामाच्या लोखंडी प्लेटा जप्त
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीस खडकी बायपास परिरात गस्त घालत असतांना त्यांना तीन तरूण गोणपाटात काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसल्याने पोलीसांनी त्यांना थांबवून झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे बांधकामाच्या 15 हजार रूपये किंमतीच्या तीन लोखंडी प्लेटा आढळून आल्या. त्या जप्त करून तिघांन ताब्यात घेण्यात आले.
चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.विजय पाटील, पोना.राहुल सोनवणे, भूषण पाटील,ज्ञानेश्वर पाटोळे,पोना.महेंद्र पाटील,आशुतोष सोनवणे, राकेश महाजन, नाना बच्छे हे खडकी बायपास परीसरात गस्त घालत असतांना तीन तरुण त्यांचेकडील गोणपाटात काहीतरी लोखंडी वस्तु घेवुन खडकी गावाकडुन चाळीसगाव शहराकडे पायी येतांना दिसले. पोलीसांनी गोणपाटात काय आहे असे विचारले असता उडवा उडवीचे उत्तरे दिली. संशय बळावल्याने त्यांची नावे विचारली असता दंडेवालबाबा नगर, धुळे येथील राहूल खैरनार,गणेश लोखंडे रा. पळाशी ता. सोयगांव जि. औरंगाबाद ह.मु खडकी ता. चाळीसगांव व भाऊसाहेब पाटील रा- तांबोळा असे सांगितले.त्यांच्याजवळील लोखंडी प्लेटाबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.तिघांना ताब्यात घेऊन लोखंडी प्लेटा जप्त केल्या. तिघांच्या विरोधात कलम 124 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Previous articleआद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next articleदेगलूर भाजप तालुका उपाध्यक्षपदी पंकज शहाजीराव देशमुख करडखेडकर यांची निवड       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here