
आशाताई बच्छाव
शिवणी येथील “आपला दवाखाना ” बनला शोभेची वस्तू
प्रविण डि. वाहुरवाघ यांचा उपोषणाचा ईशारा
अकोला (ब्युरो चीफ सतिश लाहुळकर) स्थानिक शहरालगत असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मधील शिवणी येथील ” आपला दवाखाना ” हा शोभेची वस्तू बनला आहे महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करीत आपला दवाखान्याला मंजुरी देऊन कार्यनित केले गोरगरिबांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य हे सुदृढ राहावे त्यासाठी उपलब्ध करून दिले पण या ठिकाणी कुठल्याच प्रकारे दवाखाना हा वेळेच्या निर्धारित वेळेत खुला नसतो शासनाच्या नोटिफिकेशन नुसार आपला दवाखान्याची वेळ ही सकाळी सात ते दोन तर दुपारी तीन ते दहा ही वेळ ठरवून दिली असता तसे या ठिकाणी दिसून येत नाही येथील बहुतांश नागरिक हे मोलमजुरी करून आपला उदर निर्वाह करतात महागाईच्या काळात खाजगी दवाखाना येथील मोल मजुरी करणाऱ्यांना परवडत नसल्यामुळे गोरगरीब नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून सुद्धा कर्मचारी हे रामभरोशे आहेत तसेच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे कर्मचारी हात वर करून आहेत वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन आपला दवाखाना हा सुरळीत करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अन्यथा येथे लाक्षणिक उपोषण केल्या जाईल असा इशारा येथील नागरिक प्रविण डि.वाहुरवाघ यांनी प्रसिद्धी माध्यमातून कळविले