
आशाताई बच्छाव
आम आदमी पार्टी अमरावती कडुन सोमवार ला राजकमल चौक येथे शासनाच्या कंत्राटी नोकर भरती निर्णया विरोधात निषेध आंदोलन
गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती:- राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीच्या व राज्यातील ६२ हजार सरकारी शाळा खाजगी कार्पोरेट घराण्यांना सोपवण्याचा निर्णयाच्या विरोधात मंगळवार दि. २६-०९-२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता राजकमल चौक येथे आम आदमी पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात निषेध आंदोलन आज शुक्रवार दि. २२-०९-२३ रोजी झालेल्या जिल्हा व शहर कार्यकारणी पदाधिकारीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष इंजी सुभाष गोहत्रे, शहराध्यक्ष डॉ पंकज कावरे, सचिव प्रविण काकड, युवा शहराध्यक्ष नागेश लोणारे, शहर उपाध्यक्ष नईम शेख,सुरेंद्र उमाळे, डॉ भूषण घुले, धिरज उके, सय्यद मुशर्रफ कृष्णा कडु, गौरव रामटेके सर्व जिल्हा व शहर कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आव्हान : विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवावा मोठया संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन आम आदमी पार्टी अमरावती व शहर वतीने करण्यात आले.