Home नाशिक नाशिक जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने निर्मिती मेरा देश मोहिमेअंतर्गत मातीस नमन...

नाशिक जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने निर्मिती मेरा देश मोहिमेअंतर्गत मातीस नमन व वीरांना वंदन

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0071.jpg

नाशिक जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने निर्मिती मेरा देश मोहिमेअंतर्गत मातीस नमन व वीरांना वंदन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

नाशिक जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश मोहिमेअंतर्गत, मातीस नमन, विरांना वंदन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले आहे.
भारत मातेला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांना तसेच ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता देशाच्या सरहद्दीचे दुश्मनांपासून रक्षण करणाऱ्या शूरवीरांना आदरांजली अर्पण करणे व आपल्या माती विषयी जनजागृती प्रेम व साक्षरता निर्माण करणे आधी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेंतर्गत ‘मातीला वंदन आणि नमन’ हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रदेश उपाध्यक्ष सौ जयश्रीताई अहिरराव धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णाताई जगताप यांच्या नियोजनातून थेटाळे गाव,निफाड तालुका सर्व महिला पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. महिला पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेऊन पंचप्राणाची शपथ घेतली व माती कलशामध्ये टाकली हा कलश दिल्लीकडे मार्गस्थ करण्यात येणार आहे.
यावेळी भाजप महिला पदाधिकारी रुपा केदारे,भारती महाले,नंदा शर्मा,सिंधु पल्हार,योगिता आंबेकर,अनिता खैरे,सोनाली शिंदे,योगिता खैरे,उपसरपंच ज्ञानेश्वर शिंदे ,माजी सरपंच दिगंबर शिंदे,शाहू शिंदे व सर्व महिला ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते.

Previous articleअखेर शासकीय इतमामात वीर जवान योगेश शिंदे यांना अखेरचा निरोप
Next articleगणपती माझा नाचत आला!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here