Home नाशिक उडा़न सपनों की.. व ब्रेन वॉशिंग प्रोग्राम अंतर्गत आयोजित हॉटेल बहार,पिकनिक पॉईंट,...

उडा़न सपनों की.. व ब्रेन वॉशिंग प्रोग्राम अंतर्गत आयोजित हॉटेल बहार,पिकनिक पॉईंट, नाशिक एकदिवसीय महिलांसाठी पिकनिक संपन्न..!

107
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230825-095637_WhatsApp.jpg

उडा़न सपनों की.. व ब्रेन वॉशिंग प्रोग्राम अंतर्गत
आयोजित हॉटेल बहार,पिकनिक पॉईंट, नाशिक एकदिवसीय महिलांसाठी पिकनिक संपन्न..!
नाशिक ,(प्रतिनिधी अँड विनया नागरे)-
संस्थेच्या माध्यमातून नानाविध विषयावर कार्य केले जात व तसेच महिलांना देखील स्वतःचे अस्तित्व निर्माण करता यावं यासाठी हा अनोखा उपक्रम घेण्यात आला..!

शहरापासून 25 किलोमीटर लांब गिरणारे गावाच्या निसर्गाच्या सानिध्यात विविध क्षेत्रातील सखींना हॉटेल बहार पिकनिक पॉईंट येथे एकत्र घेऊन जाण्यात आलं.

यामध्ये विविध गेम्स घेण्यात आले, मनसोक्त गप्पा महिलांनी एकमेकांमध्ये केल्या
तसेच संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ.सौ.अर्चनाताई आहेर,गणोरेकर यांनी स्वत:च्या स्वप्नांची उड़ान कशी करायची यांवर प्रेरणादायी माहिती दिली, स्वत:चे अस्तित्व समाजात निर्माण करुन घर-परिवार कसा सांभाळायचा व त्यातून स्वत:साठी कसा वेळ द्यायचा यावर देखील मंथन केलं , प्रत्येक महिला ही रणरागिणी आहे व तिने देखील एक पाऊल स्वतःसाठी बाहेर टाकणे गरजेचे यांवर देखील विचार मांडून महिलांमध्ये प्रेरणादायी ऊर्जा निर्माण केली.
तसेच संस्थेचे सचिव प्रा.ललित खैरनार यांनी महिलांमधील सुप्त गुण ओळखणे व त्याचा जगाने उपयोग करावा की वापर करावा.? यांवर उदाहरण देऊन माहिती दिली
तसेच सर्वचं महिलांनी खूप धम्माल केली, निसर्गाच्या सानिध्यात सफर केली, पेरूच्या बागेत फेरफटका मारला , सोबतच स्वादिष्ट नाश्ता, चविष्ट भोजनाचा आस्वाद घेत, मनमुराद आनंद लुटला. तसेच खूप सारे सेल्फी आणि फोटो देखील निसर्गरम्य वातावरणात महिलांनी घेतले..!
याबरोबरच संस्थेच्या वतीने आलेल्या सर्वच महिलांना संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.अर्चनाताई आहेर, गणोरेकर यांच्या हस्ते मेडल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.!

संस्थेच्या विविध उद्देश यांमधील एक की, महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यावा, स्वतःमध्ये अनेक गुण आहेत त्यांना ओळखण्यासाठी कधीतरी व्यक्त व्हावं हा आज पूर्ण झाला.
संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी यांवर देखील महिलांनी मनापासून प्रतिक्रिया दिल्या.
कार्यक्रम समारोप प्रसंगी सुदर पध्दतीने दिलखुलास नृत्याचा सर्वानी आनंद घेतला व सर्वच सुखरूप घरी परतले व सर्वच उपस्थित महिलांचे अनमोल सहकार्य लाभले.!

Previous articleव-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी -भाग ३ धाडसी दळवी ताईंना मानाचा सलाम…! तर सौ चुह्है खाके बिल्ली चली हज को!!
Next articleराष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here