आशाताई बच्छाव
किरोडा घाटात रस्ता अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
अंबादास पाटिल पवार
लोहा, प्रतिनिधी
लोहा कंधार मार्गावरील कीरोडा नजीक घाटात मोटारसायकल समोर श्वान आल्याने झालेल्या रस्ता अपघातात जुना लोह्यातील तेवीस वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना दि. २ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता चे सुमारास घडली याप्रकरणी लोहा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
जुना लोहा शहरातील भोई गल्ली भागात राहणारे मजुरी काम करणारे माधव अशोकराव जीलेवाड (व्य २३) हे एका कार्यक्रमा निमित्त दि. २ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता कंधार कडे जात असताना किरोडा पासून जवळच घाटात समोर श्वान आल्याने मोटारसायकल वरील माधव अशोक जीलेवाड यांच्या गळ्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशेष म्हणजे मयत माधव यांना केवळ दहा दिवसांपूर्वी मुलगा झाला होता. त्यांच्या मृत्यूने हळहळ होत आहे.