Home नांदेड करडखेड-मरखेलच्या खड्डेमय रस्त्यावर भारत राष्ट्र समितीचे (BRS) बेशरम आंदोलन…

करडखेड-मरखेलच्या खड्डेमय रस्त्यावर भारत राष्ट्र समितीचे (BRS) बेशरम आंदोलन…

150

आशाताई बच्छाव

IMG-20230729-WA0053.jpg

करडखेड-मरखेलच्या खड्डेमय रस्त्यावर भारत राष्ट्र समितीचे (BRS) बेशरम आंदोलन…

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार.

देगलूर – महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा देगलूर-बिदर महामार्गावर करडखेड-मरखेल अंतर्गत खूप मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या खड्यांमुळे दुर्घटनाही वाढल्या आहेत. असंवेदनशील शासन व प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे (BRS) कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये बेशरम लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांनी शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध केला. या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती नाही झाली तर परिसरातील नागरिकांना संघटीत करून रास्ता रोको व यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कैलास येसगे यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे निखिल जाधव ठाणेकर, श्रीकांत मोखेडे, बालाजी इबितदार, मोहसीन माळेगावकर, माधव झुडपे, दिपक रेड्डी, संदिप पाटील, अंबादास पवार, प्रल्हाद जाधव, शंकर शिळवणे, विनोद राठोड, संतोष पवार, रवी राठोड, आकाश जाधव, अमोल पवार, सतिष पाटील, देविदास तलवारे सह करडखेड, मरखेल, केदारकुंठा व मरखेल तांडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleहोट्टल ते देवापूर, येरगी जाणाऱ्या पुलाची दुर्दशा
Next articleधानोरा वैद्यकीय अधीक्षकांचे डॉक्टरांनवर नियंत्रणच नाही! नर्स,कंपाउंडर असून कामाचीच नाहीत.!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.