Home नांदेड होट्टल ते देवापूर, येरगी जाणाऱ्या पुलाची दुर्दशा

होट्टल ते देवापूर, येरगी जाणाऱ्या पुलाची दुर्दशा

129

आशाताई बच्छाव

IMG-20230729-WA0045.jpg

होट्टल ते देवापूर, येरगी जाणाऱ्या पुलाची दुर्दशा

नांदेड जिल्हा/प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर तालुक्यातील होट्टल ते देवापूर व येरगी गावाला जाणाऱ्या पुलावर अतिृष्टीमुळे पाणी वाहत असल्याने त्या पुलाची संरक्षक भिंत गेल्यावर्षी कोसळली होती तेव्हा 10 ऑगस्ट 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर येथे पत्र देऊन तो संरक्षक कठडा (भिंत) दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु अद्याप दुरुस्त करण्यात आले नाही. आणि आजघडीला अतिृष्टीमुळे त्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने देवापूर व येरगी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.तसेच या पाण्यामुळे संपूर्ण पुल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.तसे झाले तर वरील दोन्ही गावाचा संपर्क तुटेल.
येरगी हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे गाव असल्याने तेथे दररोज विविध राज्यातील अभ्यासक व पर्यटक येत असतात. तसेच देगलूर मुख्यालयी येण्यासाठी या दोन्ही गावांना हाच एकमेव मार्ग असल्याने या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी होट्टल व देगलूर येथे जात असतात. जर हा पुल कोसळला तर वाहतूक व बससेवा बंद होऊन या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
यामुळे या पुलाचे संरक्षक कठडे बांधून त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणीचे निवेदन सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम,तहसीलदार राजाभाऊ कदम,उप कार्यकारी अभियंता वही. डी.गिरी यांना देण्यात आले.निवेदनावर येरगीचे सरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील,ग्रामसेवक राजेश तोटावाड,तलाठी मोहन कदम व गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleशिर्डी साईबाबा संस्थान प्रसादालय चे दोन आचारीना राष्ट्रपती यांनी स्वतः राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले.
Next articleकरडखेड-मरखेलच्या खड्डेमय रस्त्यावर भारत राष्ट्र समितीचे (BRS) बेशरम आंदोलन…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.