आशाताई बच्छाव
सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे लोकसेवक प्रल्हाद पाटील वडजे आहेत – खा. प्रताप पाटील चिखलीकर
अंबादास पाटील पवार
लोहा, प्रतिनिधी
विश्वात अनेक लोक जन्मास येतात मात्र प्रत्येकजण हा हरहुन्नरी असतोच असे नाही. मात्र त्यात कांहीं अपवाद असतात त्यातीलच एक नाव म्हणजे प्रल्हाद पाटील वडजे हे आहे. त्यांनी शून्यातून आपले अस्तिव निर्माण केले. असंख्य संकटाना तोंड देत आपले कुटुंब सांभाळून गाव हे आपले कुटुंब आहे असे समजून सर्व गावाला एकत्र आनत गावच्या विकासाचा प्राण केला नव्हे तर गावाला विकासाच्या प्रमुख चळवळीत आणले. गावात विविध जाती धर्माचे लोक राहतात मात्र त्यांना सोबतीला घेवून त्यांच्या अडीअडचणीला धावून जात त्यांनी अनेकांची आपल्या परीने सेवा केली. ग्रामस्थ त्यांना सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा लोकसेवक म्हणून पाहतात. अशा या उत्कृष्ठ पालक, कर्मचारी आणि नागरिक म्हणून त्यांचे कार्य पुढील पिढीस प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
शहरातील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक तथा हळदव चे माजी सरपंच प्रल्हाद पाटील वडजे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त आयोजित सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी शहरातील गोपाळ मंगल कार्यालयात खा. चिखलीकर बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे लोहा-कंधार विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर, जि. प. सदस्य प्रतिनिधी हंसराज पाटील बोरगावकर, विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष केरबा सावकार बिडवई, भाजपचे युवा नेते दीपक पाटील कानवटे, शाळेचे मुख्याध्यापक विलास नागेश्वर, माजी उपनगराध्यक्ष केशव मुकदम, नगरसेवक छत्रपती धुतमल, माजी सरपंच साहेबराव पाटील काळे, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नगरसेवक करीम शेख, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, युवानेते सचिन मुकादम, भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील शिंदे, वंदनाताई प्रल्हाद पाटील वडजे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, संदिप पाटील वडजे, सविता सुनील पाटील शेळके, सुनील पाटील शेळके, अशोक चालिकवार, लक्ष्मीकांत बिडवई, पो. नि. संतोष तांबे, प्रा. डॉ. डी. एम. पवार, शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, नारायण चुडावकर, ठाकुर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा. चिखलीकर म्हणाले, प्रल्हाद पाटील हे फार मेहनती असून त्यांच्या एवढे कष्ट कुणीही करू शकत नाही. वडजे यांना संस्थाध्यक्ष केरबा सावकार यांनी सन्मानाची वागणूक दिली. मी प्रल्हाद पाटील यांना अनेक वर्षांपासून ओळखतो ते सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांच्या गावात अनेकवेळा विविध कार्यक्रमांना आलो. तसेच दिवाळी सणाला ही त्यांच्या प्रतिष्ठानला भेट दिली. त्यांचा सुस्वभव हा यातच सर्व कांहीं आहे. हळदव येथील श्री साईबाबा मंदिराच्या रस्त्यासाठी रस्त्यासाठी ७ लक्ष तर पुलाच्या कामासाठी १० लक्ष रुपयांचा निधी जाहीर करतो असे खा. चिखलीकर यांनी आश्वासन दिले.
यावेळी हळदव सह परिसरातील अनेकांनी सेवानिवृत्त वडजे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात सत्कार केला. तसेच वडजे यांनी आता राजकारणात सक्रिय व्हावे असेही खा. चिखलीकर म्हणाले.
.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू पाटील वडजे यांनी सूत्रसंचालन बापू गायखर यांनी तर आभार ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती होती.