Home अमरावती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचा राजीनामा मंजूर; दहा – पंधरा...

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचा राजीनामा मंजूर; दहा – पंधरा दिवसात निवडणुकीची घोषणा.

133

आशाताई बच्छाव

Screenshot_20230624-065924_WhatsApp.jpg

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचा राजीनामा मंजूर; दहा – पंधरा दिवसात निवडणुकीची घोषणा.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (ए डी सी सी) अध्यक्ष सुधाकरराव भारसाकडे आणि उपाध्यक्ष सुरेश साबळे यांचा राजीनामा गुरुवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. दरम्यान येत्या १०ते १५ दिवसात निवडणुकीची घोषणा केली जाणार असून तोपर्यंत भारताकडे व साबळे हेच काळजीवाहू अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील राजीनामा मंजूर केल्यानंतर तसा अहवाल तात्काळ प्रवाहाने राज्याच्या सहकार विभागाकडे पाठविला जावा, असा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आजच्या बैठकीचे कार्य वृत्त सहकार विभागाला कळविले जाणार असून त्यांच्या माध्यमातून ते सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविले जाईल. त्यानंतर प्राधिकरणामार्फत साधारणतः १०ते१५ दिवसात बँकेच्या नवा अध्यक्ष उपाध्यक्ष च्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. कार्यव्यवस्थेचे कारण पुढे करून दोन्ही पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी २ वाजता बँकेच्या बोर्ड रूममध्ये सभागृह संचालक मंडळाचे तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही राजीनामे मंजूर करण्यात आले. दरम्यान नव्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या नावाबद्दल अद्याप केवळ चर्चा सुरू आहे. बँकेच्या २१ संचालका पैकी१५० जन काँग्रेस आघाडीचे असून आमदार बच्चू कडू यांच्यासह केवळ सहा जण विरोधी भागात बसले आहेत. सूत्राचे मते काँग्रेसचे प्रबंध असलेल्या संचालक मंडळाने आपापसात काही काळासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष पद वाटून घेतले आहे. त्यामुळे पहिल्या दीड वर्षाचा कालखंड सुधाकर भारसाकडे व सुरेश साबळे यांना देण्यात आला होता. तेवढा कालखंड पूर्ण झाल्यामुळे त्या दोघांनी राजीनामा दिला आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी एकाच वेळी राजीनामा दिल्यामुळे सहकार क्षेत्रात आलेख तर्कवितर्क लावले जात होते
परंतु पक्षांतर्गत समजते याची माहिती उघड होता सर्व बाबींनी पूर्णविराम मिळाला असून नवे पदाधिकारी कोण असतील, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे दहा-पंधरा दिवसात निवडणूक संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चा राजीनामा मंजूर करण्यात आला. या बैठकीचे कार्य वृत्त तात्काळ सहकार विभागाकडे पाठविण्याची निर्देशही संचालक मंडळांनी दिले आहे. त्यानुसार आगामी १०ते१५ दिवसात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. त्यासाठी कार्यक्रम सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणातर्फे घोषित केला जाणार असल्याचे ए डी सी सी चे विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दैनिक युवा मराठा वृत्तपत्राच्या ब्युरो चीफ रिपोर्टर यांच्याशी बोलताना सांगितले.