Home नांदेड वर्ग मित्रांचा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न

वर्ग मित्रांचा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न

398

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0052.jpg

वर्ग मित्रांचा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न
अंबादास पाटिल पवार लोहा,(प्रतिनिधी)
लोहा येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील १९९०-९१मध्ये इयत्ता दहावी ‘अ’ ‘ब’ ‘क’मध्ये शिकलेले सर्व मित्रमंडळी फेसबुक आणि व्हॉटसअपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले आणि नांदेड येथे (दि.१८) जुन रोजी गेट-टुगेदर कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
सदरील गेट-टुगेदर कार्यक्रम निमित्ताने सर्वांना एकत्र आणण्याचं काम नारायण गोणे ,किरन महाजन ,कैलास अमिलकंठवार ,लक्ष्मण कांजले, विकास देबडवार या मित्राने केलं. सर्वजण मनापासून तयारीला लागले. सांस्कृतिक कार्यक्रमासह जेवण-खाण्यापर्यंत सर्व गोष्टींचे नीट नियोजन केले.तेहतिस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रत्यक्ष (दि.१८) जुन रोजी हौटेल पद्मावती ग्रँड मालेगाव रोड नांदेड येथे अतिशय आनंदी उत्साहपुर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. प्रथमतः कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.रांगोळीने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.प्रसंगी कार्यक्रम मैत्री या विषयावर बालाजी सोनवळे व कल्पना चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
सदरील बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय हुशार विद्यार्थ्याची बॅच. शिवाय वर्ग खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम सर्वात अग्रेसर होता असे सर्वानी जुन्या आठवणी आणि बालपणीचे किस्से सांगत माजी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन पवार, डाँ. सचिन दळवे,दिनेश मोठे,आप्पाराव पवार,संगीता चुडावकर ,वंदना दमकोंडवार ,उषा धुळगंडे,पद्मजा शिंदे,कल्पना चव्हाण, सुभाष डिकळे, मधुकर तेलंग,प्रबता पवार, जोतीबा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण कांजले यांनी तर सूत्रसंचलन माधव फुलवळे यांनी केले.

Previous articleगडचिरोली येथे २३ जून रोजी भाजपाच्या संयुक्त मोर्चाचे संमेलन
Next articleत्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा बसविण्यात यावा —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.