
आशाताई बच्छाव
अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
सर्वपक्षीय भीमसैनिकांचा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
मोताळा: युवा मराठा न्यूज तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली या कारणावरून गावातील काही गाव गुंडांनी अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या केली असून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे ज्या कुणी गावगुंडांनी अक्षय चा फोन केला असेल त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मोताळा तालुक्यातील सर्व पक्ष भीमसैनिकांनी मोताळा शहरात आठवडी बाजार ते तहसील कार्यालयापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की काही दिवसांपूर्वी भोसा येथील बौद्ध तरुण शरद बेंडे यांच्या शेतीच्या वादातून खून करण्यात आला व मुंबईतील सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहामध्ये बौद्ध तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला व चिंचोली गुरुकुल तालुका देऊळगाव राजा येथील बौद्ध धर्माच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालणारे डीवायएसपी सिंदखेड राजाचे पोलीस निरीक्षक या जातीवादी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सह आरोपीला सादर करावे व या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. वरील अन्यायग्रस्त कुटुंबांना शासनाने तात्काळ 50 लाख रुपये रक्कम देण्यात यावी तसेच वेळेत कुटुंबातील व्यक्तींना शासकीय सेवेत रुजू करण्यात यावे व सर्व आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी या संपूर्ण मागणीसाठी मोताळा तालुक्यातील आंबेडकर विचारांचा अभिप्रेत असलेल्या सर्वपक्षीय भीमसैनिकांनी आठवडे बाजार परिसरातून तहसील कार्यालयापर्यंत या संपूर्ण घटनेचा निषेध करत जन आक्रोश मोर्चा काढला तसेच तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावेळी अरुण डोंगरे, नीलकंठ वानखेडे,साहेबराव डोंगरे ,लक्ष्मणराव गवई, संतोष मेढे ,मारुती वानखेडे, बाळासाहेब अहिरे ,अनिल खराटे, शेषराव गायकवाड ,श्रीकृष्ण शिरोळकर ,अतिश इंगळे, गौतम सरकाटे ,विनोद सावळे ,विनोद धुरंदर ,सुनील तेलंग ,गजानन अहिरे, शेख जमीर, मधुकर मोरे मिलिंद अहिरे, सय्यद वसीम यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते