आशाताई बच्छाव
अक्षय भालेराव यांची हत्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दया,,:-वंचित बहुजन आघाडीची मागणी
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन
मार्फत पोलीस अधीक्षक यांना निवेदन
भंडारा,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील वंचित बहुजन आघाडी शाखा महासचिव आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ता अक्षय भालेराव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याचां मनात राग धरून जातीवादी समाजकंटकाकडून अक्षय भालेराव यांची निर्गुण हत्या करण्यात आली सदर घटना आहे मानवतेला कालीमा असणारी आहे या घटनेच्या आम्ही वंचित बहुजन आघाडी निषेध करत आहे व त्यांच्या खालील मागण्यात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी तथा 50 लाख रुपये मदत देण्यात यावे, संबंधित प्रकरणातील फिर्यादीला व साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे तसेच मयत अक्षय ची आई वडील व भावंडाच्या इच्छेनुसार समाज कल्याण विभागाने सरकारी वकीला बरोबर दुसरा एक वकील द्यावा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले ,जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा संघटक डी जी रंगारी ,निरीक्षक सुनिता टेंभुर्ण, यादवराव गणवीर, एच डी उके, चवरे,दिगंबर रामटेके, सुरेश खगार,व इतर भरपूर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते