Home अकोला अकोट ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

अकोट ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0058.jpg

अकोट ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

(अकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ मिनल पवार यांच्या वर कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची मागणी)

अकोला- अकोट ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभाराला कारणीभूत असलेल्या अकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ मिनल पवार यांची हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी केली आहे अकोट ग्रामीण रुग्णालयातील एक्स रे मशिन बंद आहे यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अकोला जिल्हात नव्हे तर अवघ्या विभागात रेफर रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या ढिसाळ कारभार समोर आला आहे कोणताही रुग्ण अकोट ग्रामीण रुग्णालयात गेला असता त्याला अकोला सर्वोपचार रुग्णालयात रेफर केले जाते एखादा अत्यंत गंभीर रुग्णचा अकोला येई पर्यंत मृत्यू होतो डिजिटल एक्स रे मशिन ची सुविधा असुनही ती रुग्णांच्या कामी येत नसेल तर ती सुविधा कोणत्या कामाची ? रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांना एक्स रे काढण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे रुग्णाची मोठी गैरसोय होत आहे एकुनच रुग्णाचे हाल होत आहेत याला जबाबदार अकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ मिनल पवार यांच्या वर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोट ग्रामीण रुग्णालयात तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर यांच्या मार्गदर्शनात उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंग तुषार वारे मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Previous articleआपत्ती प्रतिसाद दलाचे काटेपूर्णा येथे प्रशिक्षण
Next articleभा.प्र.से.शिवानंद टाकसाळे पूनच्छ: म.फुले जनारोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राज्य
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here