Home नाशिक ग्रा.पं. शेवरे येथे प्रजासत्ताक दिना निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्थेमार्फत...

ग्रा.पं. शेवरे येथे प्रजासत्ताक दिना निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्थेमार्फत आदिवासी कलागुण शिबीर संपन्न

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0036.jpg

ग्रा.पं. शेवरे येथे प्रजासत्ताक दिना निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्थेमार्फत आदिवासी कलागुण शिबीर संपन्न                          ताहराबाद,(प्रवीण पवार युवा मराठा न्युज नेटवर्क)
छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्था, मालेगांव व ग्रा.पं. शेवरे यांचे संयुक्त विद्यमाने 74 व्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2023 रोजी शेवरे ता. बागलाण जि. नाशिक येथे ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर विविध प्रकारे सजावट केलेल्या सुमारे 21 बैलगाड्याची संपुर्ण गावातून शेकडोंच्या संखेने प्रभात फेरी काढण्यात आली. प्रथम बैलगाडीत भारतीय संविधानाची उद्देशिका आणि अन्य बैलगाड्यांमध्ये कृषी, वन, आधुनिक शेती, पेसा कायदा बाबतचे घोषवाक्यांचे फलक दर्शविण्यात आले. रॅलीच्या अग्रभागी संस्थेचे अध्यक्ष मा. सिद्धार्थ पानपाटील, मा.चंद्रशेखर वाघमारे, मा. डॉ. चंदन रुद्रवंशी (तालुका पशुवैद्यकिय अधिकारी, बागलाण), मा. शिवाजी सहाने (वनपरिक्षेत्र अधिकारी,ताहाराबाद व कर्मचारी वृदं ), मा. सचिन चव्हान (व्यवस्थापक-उमेद अभियान,बागलाण ), मा. ए. टी. सोनवणे (मंडळ कृषी अधिकारी, ताहाराबाद), मा. आर. व्ही. मगर (कृषी प्रर्यवेक्षक, ताहाराबाद व कर्मचारी), डॉ. आशीतोष लाटकर (डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला), डॉ. मनोज क्षिरसागर, मुल्हेर आणि शेवरे गावातील महिला ग्रामसंघ व सुमारे 15 महीला बचत गटानी जोरदार घोषणा देऊन उत्स्फुर्थपणे सहभाग नोंदविला. रॅलीच्या अग्रभागी आदीवासी पारंपारीक पावरी वाद्यवाल्यांच्या स्थानिक कला प्रदर्शनाने लोकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतुन डॉ. मोतीराम पानपाटील यांनी उपस्थितांना साध्या सोप्या भाषेत संबोधीत केले आणि गावाच्या समृध्दीसाठी अधिकाधिक योजनांचा लाभ शेवरे ग्रामस्थांना कसा होईल यासाठी उस्थित अधिका-यांना योजनांच्या मार्गदर्शनाची विनंती केली. तदनंतर मंडळ कृषी अधिकारी, ताहाराबाद श्री. ए. टी. सोनवणे यांनी विविध कृषी योजना उपक्रमांची माहिती दिली. व्यवस्थापक-उमेद अभियान,बागलाण श्री. सचिन चव्हान यांनी शेवरे गावामध्ये सर्वाधिक 16 महिला बचत गट स्थापन केल्या बद्दल सर्व महिलांचे, सरपंच श्री. दादाजी बागुल, महिला बचत गट समन्वयक श्रीम.वैशाली चव्हान, सीआरपी. सरला पवार, कृषीसखी कविता पवार आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्था, मालेगांव यांचे विशेष करुन आभार मानले. आदिवासी जेष्ठ नेते तथा भिलवाडचे माजी सरपंच रामभाऊ पवार यांनी आदिवासीनी योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत माहिती दिली. डॉ. आशितोष लाटकर यांनी कांदा उत्पादन व साठवणुक तंत्रज्ञान, पिकांचे भौगोलिक मानांकन, कृषि पिकावरिल खत, रोग व्यवस्थापन इ. बाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणा मध्ये मा. डॉ. चंदन रुद्रवंशी, तालुका पशूवैद्यकिय अधिकारी,बागलाण यांनी याप्रकारचा कार्यक्रम उत्कृष्टपणे आयोजित केल्या बद्दल छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्था, मालेगांव संस्थेचे अध्यक्ष मा. सिद्धार्थ पानपाटील यांची प्रशंसा केली. सोबतच पशुसंवर्धन योजनांची माहीती ग्रामस्थांना दिली आणि पशुचिकित्सा व पशुसंवर्धन योजनांसाठी एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्याची ग्वाही दिली.
शेवटी महिला बचत गट व बैलगाडी संघटना, आदर्श शेतकरी व पशुसंवर्धक, पावरी वादक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना संस्थेमार्फत सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी मा. ग्रामसेविका सौ.सुरेखा बच्छाव, पं.स.सदस्य मा. श्री. रामदास सुर्यवंशी, सरपंच मा. श्री. दादाजी बागुल, उप-सरपंच सौ. हिरुबाई बागुल मा. श्री. गुलाब पवार, मा. श्री. वनाजी देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्री. चंद्रशेखर वाघमारे, श्री. रमेश सुर्यवंशी, श्री. काळु बागुल, श्री. भास्कर सुर्यवंशी इ. सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleग्रा.पं. शेवरे येथे प्रजासत्ताक दिना निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्थेमार्फत आदिवासी कलागुण शिबीर संपन्न
Next articleआजची मेजवानी रेस्टॉरंट स्टाईल पनीर पसंदा रेसिपी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here