Home गुन्हेगारी सटाणा शहरातील दोन तरुणांकडून दोन लाख रुपयांचा गांजा जप्त; बड्या घरांमधील युवक...

सटाणा शहरातील दोन तरुणांकडून दोन लाख रुपयांचा गांजा जप्त; बड्या घरांमधील युवक रडारवर

159

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0005.jpg

सटाणा शहरातील दोन तरुणांकडून दोन लाख रुपयांचा गांजा जप्त; बड्या घरांमधील युवक रडारवर

मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सटाणा शहरातील दोन तरुणांकडे तब्बल दोन लाख रुपयांचा गांजा आणि रोख रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील आणि त्यांच्या टीमने ही मोठी कारवाई केली असून याप्रकरणी दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली आहे.
भाक्षी रोडच्या समर्थ नगरमधील मंगेश धर्मा बगडाणे व मंगल नगर येथील अजय उर्फ शिवा सीताराम चौरे यांच्या घरात धाड टाकून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला असून या गंभीर गुन्ह्यात शहरातील बड्या घरांमधील तरुणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सटाणा पोलीस ठाण्याचे किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पवन शंकर सुपनर यांनी ही धडक कारवाई केली असून सटाणा शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मंगेश बगडाणे याच्या घरातून साडेतीन किलो गांजा मिळून आला असून मंगलनगरच्या अजय चौरे या बत्तीस वर्षीय युवकाच्या घरातून सहाशे शहाणव गांजाच्या पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सटाणा शहरातील अनेक युवक गांज्याच्या आहारी गेले असल्याची चर्चा होत असतांना आज झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे गांजा प्रकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.