Home पुणे पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

131

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0040.jpg

पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना खेड तालुक्यातील रकस्थळ गावात घडली. थिगळे यांच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थिगळे शनिवारी रात्री रकस्थळ गावात घरासमोर थांबले होते. त्यावेळी एक हल्लेखोर तेथे आला. ‘तुला माज आला आहे. एकाला संपवलाय, आज तुलाही संपवतो,’ असे म्हणून हल्लेखोराने थिगळे यांच्यावर पिस्तूल रोखले. हल्लेखोराने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. हल्लेखोराने थिगळे यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, गोळी न सुटल्याने थिगळे बचावले. त्यानंतर हल्लेखोराने पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत माजविली. हल्लेखोर पसार झाला. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात घबराट उडाली. पसार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Previous articleसटाणा येथील फौजदार बंगला दारूबंदी विभागाच्या अधिका-यांकडून सील
Next articleचेंबर फुटल्याने पसरले घाणीचे साम्राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.