Home गडचिरोली मा.नामदार श्री. नरहरी झिरवाळ साहेब विधानसभा उपाध्यक्ष व मा.आमदार तथा माजी राज्यमंत्री...

मा.नामदार श्री. नरहरी झिरवाळ साहेब विधानसभा उपाध्यक्ष व मा.आमदार तथा माजी राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे साहेब यांच्या उपस्थितीत सोमवार दि.५ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाची बैठक

146
0

आशाताई बच्छाव

IMG-20221203-WA0017.jpg

मा.नामदार श्री. नरहरी झिरवाळ साहेब विधानसभा उपाध्यक्ष व मा.आमदार तथा माजी राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे साहेब यांच्या उपस्थितीत सोमवार दि.५ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाची बैठक                 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

19 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राज्यातील विविध मागण्यांना घेवून राज्य सरकारच्या विरोधात राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चासाठी विदर्भातून जास्तीत जास्त संख्येने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन आणि या संदर्भात नियोजन व तयारी चा आढावा घेण्यासाठी विधान सभा उपाध्यक्ष नामदार श्री. नरहरी झिरवाळ साहेब व माजी राज्य मंत्री तथा आमदार श्री.संजय बनसोडे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे पॅरेंट/महीला/युवक/युवती/सेवादल/विद्यार्थी तसेच पक्षाच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा/तालुका/शहर अध्यक्ष,आणि जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहायचे आहे.
दिनाक:- ०५/१२/२०२२ दुपारी :- १२:०० वा. स्थळ:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, कॅनेरा बँक समोर,चामोर्शी रोड, गडचिरोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here