• Home
  • शिवाजी महाराजां बद्दल अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

शिवाजी महाराजां बद्दल अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0105.jpg

शिवाजी महाराजां बद्दल अवमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून सडके कांदे भरलेली काळी टोपी जाळून केला राज्यपालाचा निषेध
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्या नेतृत्वात स्थानिक इंदीरा गांधी चौक येथे कांदे भरलेलं बोरं व काळी टोपी जाडून निषेध करण्यात आला.
राज्यात ठीक ठिकाणी राज्यपाल यांच्या निषेधार्थ तीव्र रोष व्यक्त करीत आंदोलने होत आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देखील भाज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला. तात्काळ महाराष्ट्र राज्यातून हाकलण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही.
चार दिवसांपूर्वी वि. दा. सावरकरांचा अपमान झाला. म्हणून मंत्रीमंडळ बैठकीत निषेध करणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराजांच्या अवमानाबद्दल मात्र गप्प आहे. याचा अर्थ या सरकारसाठी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले हे महापुरूष नाहीत का..? असा प्रश्न देखील सर्व सामान्य नागरिकांपुढे उपस्थित होत आहे.
आज केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, राकाँ. शहराध्यक्ष चे विजय गोरडवार,राकाँ. जिल्हा सचिव संजय कोचे,राकॉ उपाध्यक्ष योगेंद्र नांदगाये, महिला विभागीय सचिव सोनाली पुण्यपवर,राकाँ. जिल्हा सचिव संजय कोचे, शहर कार्याध्यक्ष कपील बागडे, जिल्हाउपाध्यक्ष प्रसाद पवार, शहराध्यक्ष अमोल कुळमेथे,महेश टिपले, जिल्हा सचिव आकाश पगाडे, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, कार्याध्यक्ष हीमांशू खरवडे, जिल्हा सचिव आकाश पगाडे, जिल्हाध्यक्ष् सेवादल अमरकुमार खंडारे, कार्याध्यक्ष् चेतन गद्देवार, युवती तालुकाध्यक्ष जामिनी कुलसंगे, विद्यार्थी शहर अध्यक्ष रितीक डोंगरे, संघटक सेवादल सुनिल कन्नोजवार, राविका उपजिल्हाध्यक्ष सागर दडमल, राविका सरचिटणीस पराग दांडेकर, संकेत जनगणवार, आदीनाथ मंगर, आदीत्य जावळे, प्रतीक टेकाम, अंकुश झरली, खामेश बोबाटे,नितीन पोटे, अमोल कुमरे, संजय बोधलकर, मिथून नैताम, महेश टिकले, अरविंद डोंगरे आदी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment