आशाताई बच्छाव
संपादकीय अग्रलेख…
विचारांच सोन लुटूया!
वाचकहो,
आज दसरा म्हणजे विजयादशमी! सीमोल्लघंनाचा आजचा दिवस! विजयोत्सव साजरा करताना,दुर्गूणांवर मात करुन सत्याचा जयजयकार करण्याचा आजचा दिवस.आम्ही “युवा मराठा”च्या माध्यमातून शब्दांनाच आमचा आधार मानून…शब्दांमुळेच आम्ही झालो पावन,शब्दची आमूचे धन आणि शब्दची आमूचे ऋण हेच तत्व आत्मसात करीत आम्ही आमची विचारसंपदा कधी कुणासाठी बदलेली नाही किंवा केवळ काही क्षणिक लाभापोटी लाचारीही पत्करली नाही,म्हणूनच आज विचारांचे सोने लूटूत असताना आम्हांला प्रकर्षाने आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या महाराष्ट्र भरातील असंख्य प्रतिनिधीचा अभिमान वाटतो.आमची विचारशक्ती म्हणजे अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन चालताना आमचे विचार हे आम्ही महाराष्ट्रातल्या एकवीस जिल्ह्यातील विचारवंताना पटवून देण्यात व्यशस्वी ठरलोत,म्हणूनचआजवर आम्ही महाराष्ट्रात जी वाटचाल सुरु ठेवली आहे.त्यात फक्त आमचे विचार सगळ्यांना पटल्याने आम्ही अगदी फकीर व अत्यंत गरीबी अवस्थेतील असतानासुध्दा मोठा मित्रपरिवार,कौटूंबिक जिवा भावाचे सदस्य “युवा मराठा”ला महाराष्ट्रभर लाभलेत.हाच खरा विजयोत्सव व दसरा!अन्यायाविरुध्द लढून,संघर्ष करुन आमच्या परिवारातील प्रत्येक प्रतिनिधीच्या हक्कासाठी श्वासात श्वास असेपर्यत लढा हा सुरुच राहिल “युवा मराठा” शी जोडला गेलेला प्रत्येक जण आमचा कुटूंबातील सदस्य असल्याने अर्थात त्यांच्या हितासाठी व हक्कासाठी अखेरच्या क्षणापर्यत आमचे हे लेखनीयुध्द सुरुच राहिल हेच आमचे सीमोल्लघंन..!आणि आजच्याच दिवशी आपण सगळे मिळून विचारांचे सोने लुटूया.विजयादशमी दस-यांच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभकामना! आपला सगळ्यांचा शुभचिंतक -राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक