Home नाशिक नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची नांदगाव गंगाधरी येथिल स्वयंभू गणेश...

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची नांदगाव गंगाधरी येथिल स्वयंभू गणेश मंदिराला भेट

85
0

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0017.jpg

नमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल यांची नांदगाव गंगाधरी येथिल स्वयंभू गणेश मंदिराला भेट

नांदगाव,(आनिल धामणे)

नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष .संजय बागुल उपाध्यक्ष,सरिता बागुल ,रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.
24 सप्टेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसेच सर्व विद्यार्थ्यांनी स्वयंभू श्री गणेश मंदिर गंगाधरी (रुईचा गणपती) मंदिराला प्रत्यक्ष भेट दिली. मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम गणेश भक्त देवराम बाबा यांच्या समाधीचे दर्शन होते. असे म्हणतात की प्राचीन काळात रुईच्या झाडामध्ये गणपती प्रगट झाले, त्यामुळे त्याला रुईचा गणपती असे नाव देण्यात आले. तसेच तिथे खूप मोठी जुनी विहीर आहे त्या विहिरीमध्ये कासव तसेच मासे सुद्धा आहे मुले कासव आणि मासे प्रत्यक्षात बघून आनंद व्यक्त करत होते. मंदिराचे प्रमुख . किशोर जाधव यांनी आम्हाला या प्राचीन मंदिराची माहिती दिली. तसेच त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. टाळ्यांच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शाळेच्या वतीने किशोर जाधव यांना थँक्यू कार्ड देण्यात आले.
ही भेट उत्तम रित्या घडवून आणण्यात रेंनबो इंटरनशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी ,एडना फर्नांडिस ,मोनाली गायकवाड ,सुषमा बावणे , चैताली अहिरे अश्विनी केदारे मॅम, रोहिणी पांडे तसेच मदतनिस वैशाली बागूल , अनिता नेमनार रविंद्र पाटील तसेच ड्रायव्हर मंगेश शिंदे, विनोद चौधरी, बाळू गायकवाड, सागर कदम, नासीर खान पठाण, चंद्रकांत बागूल, यांनी अतोनात मेहनत घेऊन आजची ही सहल उत्तम रित्या घडवून आणण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here