Home सातारा कास पठार होऊ लागले भकास!

कास पठार होऊ लागले भकास!

358

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0024.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: कास पठार होऊ लागले भकास! कास पठार जिल्हा सातारा हे पठार महाराष्ट्रातील स्वर्गच आहे असं म्हणणे वावग ठरणार नाही. रानफुलाने बहरलेले सौंदर्य हे कास पठाराचे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील खूप मोठ्या प्रमाणावर असलेली झाडी महाराष्ट्राचे सौंदर्य मध्ये भर घालणारी आहे. उंच -उंच डोंगर रांगा अशाप्रकारे स्वतः तयार करून त्या ठिकाणी निर्माण केले असं वाटतं .अनेक पर्यटक कास पठार पाहण्यासाठी महाराष्ट्रातून ,त्याचबरोबर देशभरातून तिथे येत असतात. हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक रंगांची भरलेली फुले रंगीबेरंगी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु आता त्या कास पठारावरती अवैध बांधकाम होऊ लागले आहे. कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दोन्ही साईडला बेकायदेशीर बांधकामाला सुरुवात झाली आहे .तेथील ग्रामस्थ यांचा असं मत आहे की हे बेकायदेशीर बांधकामे त्वरित थांबावेत. कास पठाराच्या सौंदर्याला कोणीतरी नख लावण्याचा प्रयत्न करतेय तो थांबला पाहिजे. पूर्वीचे जिल्हाधिकारी यांनी नोटीसा दिल्या होत्या परंतु राजकारणाच्या गलिच्छ कामात त्यावरती कारवाई झाली नाही. परंतु आता जिल्हाधिकारी रुचेस यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या बांधकामासाठी नोटिसा पाठवले आहेत, सांगितले की अवैध बांधकाम हे पूर्णपणे थांबवले जाईल. बाहेरून आलेल्या लोकांचे बांधकाम पाडण्यासाठी विनंती होत असताना तेथील स्थानिक नागरिकांवर ही अत्याचार होतोय ,त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिकांना बांधकाम वरती गदा न येता फक्त नवीन बांधकाम पाडण्यात यावे असे सांगण्यात येत आहे. वनविभागाने देखील इथे नवीन बांधकाम होणार नाही अशी शाश्वती दिली होती. परंतु त्यावर आतापर्यंत कुठली कारवाई नाही. हे जर सौंदर्य महाराष्ट्राचे स्वर्ग ,असेच टिकून ठेवायचे असेल तर नवीन होणारे बांधकाम थांबले पाहिजेत . कुठेतरी राजकारण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Previous articleकळवणला दहा हजाराची लाच घेताना सहाय्यक प्रकल्पआधिकारी वडजे रंगेहाथ अटक
Next articleसमर्थांचे देव चोरणारे चोर ८ दिवसानंतरही मोकाटच!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.