
आशाताई बच्छाव
सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे पोळा सण उत्साहात साजरा!
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बुलढाणा अर्बन चारिटेबल ट्रस्ट बुलढाणा द्वारा संचालित सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वरवट बकाल येथे पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहकार विद्या मंदिराचे अध्यक्ष माननीय डॉक्टर किशोर केला सर तसेच मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बैलपोळा सणाचे महत्व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले तसेच शाळेचे पालक व परिसरातील शेतकरी माननीय श्री दिनकर पाटील व सुनील पाटील जवंजाळ यांचा शाळेचे प्राचार्य श्री प्रकाश भुते सर तसेच प्राचार्य योगेश घाटोळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.बुलढाणा अर्बन परिवारातर्फे सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याचे शुभेच्छा देण्यात आल्या आणि बळीराजाचे राज्य यावे अशी बळीराजाला प्रार्थना! करण्यात आली!