
आशाताई बच्छाव
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून नागापूर एकलव्य वस्तीवरील आदिवासी बांधवांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
वर्षानु वर्ष रेशनकार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी वस्त्यांवरील कुटुंबांना घरपोच निशुल्क रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहीम आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून निरंतर सुरू आहे.
आज नागापूर तालुका नांदगाव येथील एकलव्य नगर पाची पुल वस्तीवरील 70 कुटुंबीयांना रेशन कार्ड ( शिधा पत्रिका) चे वाटप करण्यात आले.
अनेक वर्षांपासून रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी समाज बांधव या वेळी आनंदाने भारावून गेला होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्य रेशन कार्ड हातात घेऊन कुतूहलाने आनंदित होऊन पाहत होता.
आमदारांच्या माध्यमातून आज आपण रेशन कार्ड धारक झालो याचा आनंद त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होता.
शिवसेनेचे आदिवासी समाज संघटक भाऊराव भाऊ बागुल यांनी गेल्या महिन्याभरापासून सर्व आदिवासी बांधवांचे कागदपत्र जमा करून रीतसर पाठपुरावा करून रेशन कार्ड तयार करून घेतले व आज वस्तीवरील एक छोट्याशा समारंभात कार्डचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी आदिवासी समाज संघटक भाऊराव बागुल, सरपंच नागापूर शिवसेना नेते सुधाकर पवार,गोविंद सोमासे,भीमराव पवार,नितीन सोनवणे, लक्ष्मण खुरसने,पिंटू व्हडगर,रामदास सोनवणे, रोहित कूवर, लहू गायकवाड, नागू मोरे, बंसी सोनवणे, धनाजी तांबे, प्रकाश पवार, हिराबाई गोधडे, दत्तू पवार,अनिल खुरसने,अनिल सोनवणे पाचीपुल वस्ती एकलव्य नगर नागापूर येथील नागरिक उपस्थित होते.