Home Breaking News उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन

उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन

134

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0032.jpg

उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन                          मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.
उद्धव ठाकरेंनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळालं आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या मुलावर ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं खासदार अरविंद सावंत , आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आलीय. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा बांधायला सुरुवात केलीय. ह्या नियुक्तींमुळं उद्धव ठाकरेंकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचं पहायला मिळत आहे.