Home सोलापूर चुकीच्या दिशेनं आलेल्या माल ट्रकची एसटीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

चुकीच्या दिशेनं आलेल्या माल ट्रकची एसटीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0014.jpg

चुकीच्या दिशेनं आलेल्या माल ट्रकची एसटीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आटपाडीकडून पंढरपूर कडे येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आज कराड रोडवर भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन प्रवासी ठार तर सहा जण जखमी झाले आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात अलीकडे राज्यात वाढताना दिसत असल्याने या बसचा प्रवास देखील आता सुरक्षित बनवू लागला असतानाच आज पंढरपूर तालुक्यात हा मोठा भीषण असा अपघात झाला आहे
राज्य परिवहन महामंडळाची बस आज आटपाडी येथून पंढरपूरकडे येत होती ही बस पंढरपूर तालुक्यातील सोनके गावाजवळ पोहोचली असताना समोरून वेगात येत असलेल्या एका ट्रकने (एम एच 50/2166) सरळ एस
टी ला जोराची धडक दिली.
या अपघातात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील दोन प्रवासी ठार झाले तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत . सदर अपघातात बस आणि ट्रकच्या समोरासमोर बाजूचा चक्काचूर झाला आहे.अपघात होताच आजूबाजूचे नागरिक धावत गेले तर या मार्गावरून जाणारे अनेक जण घटनास्थळी थांबले होते
अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि अपघातांची पाहणी केली. सदर प्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून जखमी प्रवाशांची संख्या ही 20 च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous articleकेरसाणे दसाणे परीसरात बैलपोळा उत्साहात साजरा
Next articleसांगवीतील भाजीवाल्या काकांकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप …….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here