आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
मुलगा होण्यासाठी अघोरी कृत्य करायला लावणाऱ्या भोंदू बाबाला अखेर अटक
ब्युरो टिम कोल्हापूर युवा मराठा न्युज नेटवर्क
मुलगा होण्यासाठी विवाहितेला अघोरी कृत्य करायला लावणाऱ्या कोल्हापुरातील भोंदू बाबाला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. मौलाना बाबा जमादार (इचकरंजी) असे या भोंदू बाबाचे नाव आहे.
त्याने मुलगा होत नाही म्हणून विवाहित महिलेला संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर धबधब्याच्या जवळ विवस्त्र होऊन अंघोळ करण्याचा अजब सल्ला दिला होता. डिजिटल मीडिया, प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारित होताच पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली. याशिवाय पीडित महिलेचा पती, सासू, सासरे यांच्यावरही पोलिसांनी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.