Home रत्नागिरी संगमेश्वर भडकंबाच्या हर्षराज शिंदेचे C.B.S.E. दहावी मध्ये उल्लेखनीय यश

संगमेश्वर भडकंबाच्या हर्षराज शिंदेचे C.B.S.E. दहावी मध्ये उल्लेखनीय यश

105

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0011.jpg

संगमेश्वर भडकंबाच्या हर्षराज शिंदेचे C.B.S.E. दहावी मध्ये उल्लेखनीय यश                                  रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सन 2022 मध्ये CBSE बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इ. 10 वी च्या परीक्षेत भडकंबा गावचे सरपंच प्रशांत उर्फ बापू शिंदे यांचे सुपुत्र हर्षराज शिंदे याने 94 % मार्क्स मिळवून उत्तम यश संपादन केले . त्याने मिळालेल्या यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख विलासजी चाळके यांनी हर्षराज याचा सत्कार करून त्याचे विशेष कौतुक केले.

या यशामुळे माझ्या भडकंबा गावचे नाव उंचावले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच या यशामध्ये माझे सर्व शिक्षक वर्ग व आई वडील व माझे कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे हर्षराज याने बोलताना सांगितले. या प्रसंगी महिला बाल कल्याण सभापती सौ. रजनी चिंगळे शिवसेना उपतालुकाप्रमुख शेखर कोलते, संजय कांबळे , बापू शिंदे, दाभोळे मा. सरपंच व सोसायटी चेअरमन बाळकृष्ण सकपाळ, यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसैतवडेत विजेच्या खांबाला बीएसएनएलचा पोल टेकला; दुर्घटनेची शक्यता
Next articleरामपेठ अंगणवाडीत दहीहंडी साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.