Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानीचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई द्यावी

गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानीचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई द्यावी

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0062.jpg

गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानीचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई द्यावी                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आढावा बैठकीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची कृषिमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांच्याकडे मागणी

कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ,फळ पिकांचे जमिनीबाबत नागपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन

गोसेखुर्द व मेडीगट्टा धरणाच्या प्रभावामुळे ३ वेळा जिल्ह्यातील पीक वाहून गेल्याने या नुकसानीची भरपाई देण्याची आवश्यकता

धानाच्या पऱ्यांच्या क्षेत्राची नुकसान दाखवण्यात आली असून नुकसान झालेल्या पूर्ण शेतीची माहिती दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन

गोसेखुर्द धरणाच्या व मेडिगट्टा धरणाच्या प्रभावामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असून सतत ३ वेळा पीक वाहून गेले ,पीक बुडाले, सडून गेले. परंतु या आढावा बैठकीमध्ये दाखवण्यात आलेल्या नुकसानीचे क्षेत्र अतिशय कमी असून केवळ धानाच्या पऱ्यांच्या क्षेत्राची नुकसान दाखवण्यात आली असून नुकसान झालेल्या पूर्ण शेतीची मात्र त्यातून माहिती वगळण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्व नुकसानीची भरपाई मिळण्याची आवश्यकता असल्याने पुन्हा या नुकसानीचे सर्वेक्षणाची करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या आढावा बैठकीमध्ये केली

मा. कृषिमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ,फळ पिकांचे जमिनीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानीची वस्तुस्थिती मांडली

बैठकीला राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुलजी सत्तार ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण व तेलंगाना राज्याच्या मेडिगट्टा धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लक्षावधी हेक्टर जमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसाळ्यामध्ये तीन वेळा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे नुकसान प्रचंड झालेली असतानाही केवळ पऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाने सरकारकडे सादर केलेले आहे. हे पूर्णतः चुकीचे असून शेतकऱ्यांच्या पूर्ण नुकसानीची मदत त्यांना मिळालीच पाहिजे त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असून त्याबाबतचे निर्देश आपण द्यावेत अशी विनंती या बैठकीमध्ये आमदार महोदयांनी मंत्री महोदयांना केली आमदार यांच्या सूचनेवरून मंत्री महोदयांनी याबाबतचे निर्देश देण्यात येतील असे आश्वस्त केले.

Previous articleताडगांव (भामरागड)येथील तिर्थगिरीवार कुटुंबियांचे खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनपर भेट.
Next articleकांचन डिजिटल यांचे वतीने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here