आशाताई बच्छाव
बूथ सक्षमीकरण अभियान तातडीने पूर्ण करा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
३४२ या गुंडापल्ली बुथाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली बैठक
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कमी मत मिळालेल्या बुथाच्या सशक्तीकरणाचे अभियान हाती घेतले असून त्या अंतर्गत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गुंडापल्ली येथील बुथाची बैठक घेतली
या बैठकीला भाजपाचे विकासजी मैत्र,राजेश्वर दुर्गे, रामदास सिडाम, उष्टू आत्राम ,किशोर सिडाम, अरविंद मेश्राम यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते
३४२ या गुंडापल्ली येथील या बुथवर लोकसभा निवडणुकीमध्ये कमी मत मिळाली होती ज्या बुथवर भाजपाला कमी मत मिळाली आहेत अशा बुथाच्या सशक्तीकरणाचे अभियान या बुथाचे निरीक्षक विकासजी मैत्र आहेत त्यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बैठक घेऊन बूथ सशक्तीकरणा संदर्भात मार्गदर्शन केले.