आशाताई बच्छाव
जेष्ठ शिवसैनिक ऋषिजी पिपरे यांचे दुःखद निधन कुटुंबाला दिला शिवसेनेने आधार… !
शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याकडून पिपरे कुटुंबाचे सांत्वन व आर्थिक मदत
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील बेलगाव येथील जेष्ठ शिवसैनिक ऋषीजी पिपरे यांचे नुकतेच किडनी विकाराने दुःखद निधन झाले. मृत्यू पावलेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबांची शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी भेट घेऊन पिपरे परिवाराचे सांत्वन केले. तसेच सेवाभाव जोपासत कुटुंबाला आर्थिक मदत दिली.बेलगाव येथील ऋषीजी पिपरे हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक होते. ते धार्मिक व साामजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. पिपरे यांनी एक कट्टर शिवसैनिक म्हणून पक्षाची पाळेमुळे तळागाळा पर्यंत रूजवली. पक्षाच्या जडणघडणीत त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. त्यांनी अखेर पर्यंत शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले. सन १९९७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप समर्थ यांना निवडून आणण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावली. ऋषी पिपरे यांना किडनी विकार झाला होता. त्यांचे नुकतेच दुखद निधन झाले.शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या शिवसैनिकांसह बेलगाव येथे जाऊन पिपरे कुटुंबियांचे सांत्वन केले. सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवीत सेवाभाव जोपासून कुटुंबाला आर्थिक मदत दिली. शिवसेना तुमच्या पाठीशी असून भविष्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास मदतीसाठी मी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही देत शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी पिपरे कुटुंबाला आधार दिला. जेष्ठ शिवसैनिक ऋषीजी पिपरे यांनी शिवसेनेसाठी दिलेले योगदान महत्वपुर्ण असून त्यांच्यामुळेच ग्रामीण भागात शिवसैनिक निर्माण झाले आणि शिवसेना तळागाळा पर्यंत पोहचली.पक्षकार्यासाठी ऋषीजी पिपरे यांनी दिलेले योगदान शिवसेना कदापीही विसरणार नाही, अशी भावना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी व्यक्त केली.याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,नवनाथ ऊके,संदीप भुरसे,स्वप्निल खांडरे, अरुण बरपात्रे,राजू जवाडे, गोपाल मोगरकर,रुमाजी भांडेकर,राहुल सोरते,आनंदराव मोगरकर,बंडूजी लटारे, विठ्ठल पिपरे,रविंद्र पिपरे,रामदास कोठारे,मधुकर सातपुते,नागेश पिपरे,किसान सातपुते, निरंजन लोहबरे, यादव चुधरी,परसराम नैताम, रमेश नैताम,नाज़ुकराव जुमनाके,ऋषिजी लटारे,विनायक लटारे,यांच्या सह बेलगांव येथील शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते