आशाताई बच्छाव
गडचिरोली शहरात पुन्हा एक मानाचा तुरा.–माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे
कारगील चौकातील स्मारकाचे सौन्दयीकरण
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पाकिस्तान वि रुध्द युद्ध जिंकण्यात आले, पाकिस्तानी सैनिकांनी कारगील भागावर अतिक्रमण करुन भारताचा भूभाग बळकवण्याचा पाकिस्तान चा प्रयत्न होता.परंतु देशाचे तात्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असतांना कारगील युध्द झाले.या कारगिल युद्धात अनेक शूरवीरांनी बलिदान देवुन विजय मिळवला.कारगिल युद्धात वीर मरण आलेल्या शूरवीरांची भारत वासीयांना आठवण व्हावी,म्हणुन गडचिरोली शहरातील कारगिल चौकात स्मारकाचे बांधकाम करण्यात आले. या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे बोलत होत्या.
पुढे बोलताना गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथे स्मारक व्हावा याकरिता स्मारक समितीचे अध्यक्ष उदय धक्काते यांनी नेहमी माझ्याकडे पाठपुरावा केला.त्या अनुषंगाने गडचिरोली नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत कारगिल युद्धात जे जवान शहीद झाले त्यांचे स्मारक व्हावे या विषयावर माझ्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली व तो विषय सर्वानुमते मंजूर करून आठवडी बाजार जवळील मोकळ्या जागेत कारगिल चौक सौन्दर्यीकरन करुन एक चांगले कारगिल स्मारक उभे करावे असे ठरले.
माझ्या नगराध्यक्षच्या कार्यकाळात पाठपुरावा करून वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत ३१ लाखाचे अनुदान प्राप्त करून अनुप पोहेकर(शंभु फायबर आर्ट) व कला संचणालय महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे सौन्दर्यीकरण व स्मारकाच्या कामाची रूपरेषा तयार करण्यात आली व निविदा काढण्यात आली.असेही प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी यावेळी केले.
७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी १५ ऑगस्टला मा.खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते कारगिल स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार डॉ. देवरावजी होळी,कारगील युद्धामध्ये सहभागी होवुन कारगील युध्द हाताळले मा.रिटायर्ड ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी, डॉ. शिवनाथ कुंभारे, मुख्याधिकारी विशाल वाघ,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे,माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,माजी सभापती,मुक्तेश्वर काटवे,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,नीता उंदिरवाडे,धानोरा नगरपंचायत मुख्याधिकारी बेंबरे,अभियंता भालेराव,स्मारक समितीचे अध्यक्ष उदय धक्काते व कारगील चौक स्मारक समितीचे सदस्य, बंडोपंत गाडेकर,सुनील देशमुख व रेखा डोळस तसेच अनेक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.