आशाताई बच्छाव
नांदगाव शहरात रेल्वे थांब्यासाठी धरणे आंदोलन,
नांदगांव प्रतिनिधी अनिल
– नांदगाव रेल्वे स्थानकावरील गाड्याच्या थांब्या करीता “आम्ही नांदगावकर, प्रश्न-माझ्या गावाचा ” या आशयाचे फलक लावत काही दिवसापूर्वी सर्वाचे लक्ष वेधले होते. रेल्वे प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी आज दि. १६ अॉगस्टला सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नांदगाव शहरातील महात्मा गांधी चौक येथे धरणे आदोलन करण्यात येणार आहे. नांदगावकरांनी उपस्थित राहुन गाड्या थांबा मिळून देण्याकरीता सहभाग नोंदविण्यास सांगण्यात आलेले आहे. नांदगाव रेल्वे थांबे , पादचारी पुल तसेच अशा अनेक समस्या सुटण्यासाठी या शांततामय व कायदेशीर आदोलन असेल, तहसिलदारांना दिलेल्या परवानगीच्या पत्रात विनंती करण्यात आलेली आहे. सर्व गाड्याचा थांबा नसल्याने यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांचे होल होत आहे. विकासात रेल्वे गांड्याचे थांबे महत्वाचे तरच शहराची कनेक्टीविटी वाढते, यामुळे प्रगती चालना मिळते असते. प्रवाशी ही रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. यासाठी कोविड-19 काळापूर्वी थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन्स ला नांदगाव स्टेशनवर पुन्हा थांबे बहाल करावे , नांदगावकर अशी मागणी करत आहे . रेल्वे थांबा मिळावा यासाठी शहरात बॅनरबाजी , रिक्षाला भोंगा लावून नांदगावकरांना माहिती दिली जात आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त काशी , महानगरी एक्स्प्रेसला दोन गाड्याना थांबा दिला आहे. तर जनता, कुर्शीनगर, झेलम, कामायनी, शालीमार, हुतात्मा एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी आहे. नांदगावकर बाकी गाड्यासाठी मागणी लावून धरत आहे. प्रवांशाच्या सोयी होईल अशा रेल्वे गाड्याना थांबा मिळणे गरजेचे आहे . मी नांदगांवकर बबलु सैय्यद हे आमच्या प्रतिनिधी बोलताना नांदगावकर मागणीसाठी काय भूमिका मांडतात यासाठी धरणे आदोलनांकडे बघितले जात आहे.