Home चंद्रपूर राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात सांस्‍क़ृतिक...

राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0077.jpg

राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात

सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

चंद्रपुर/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापूढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसुन भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सांस्‍कृतिक कार्या विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Previous articleगुराखीवर वाघाने केला हल्ला,हल्यात गुराखी ठार
Next articleभारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मुक मिरवणूक/यात्रा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here