आशाताई बच्छाव
अवैद्य धंदे बंद करण्याबाबत सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील सोनाळा पोलीस स्टेशन यांच्या हद्दीतील टुनकी, सोनाळा, बावनवीर, लाडनापूर येथे अवैध दारू विक्री फार मोठ्या प्रमाणात सुरु असुन. गावठी दारूसह इतरही अवैध धंद्यांना ऊत आला आहे.आदिवासी समाज वरली मटक्याच्या आहारी गेल्याने कित्येक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहे. त्यामुळे ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष कासम सुरत्ने यांच्यासह नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, वरली मटक्याला आळा घालण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या.वारांवर अनेक निवेदनही दिली आहेत परंतु त्याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही करता जगणे कठीण झाले आहे
टुनकी येथे पोलीस चौकीच्या बाजूला वरली मटका चालतो. अनेक ठिकाणी वरली मटका चालवणारे एजंट पावत्या लिहताना दिसतात. या सर्व प्रकाराला स्थानिक पोलिस कर्मचारी जबाबदार असून अर्थपूर्ण संबंध असल्याने वरली मटका सुरू आहे. या अवैध धंद्यांमुळे परिसरातील आदिवासी बांधवांचे जीवन उद्धवस्त होत आहे. आदिवासी बांधवांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. येथील जनता या अवैध धंद्यांना कंटाळली असून जनसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.
अवैध धंद्याचे प्रमाण वाढले असून शेतातील स्प्रिंकलर, पाईप, मोटार पंप पशुधनासह मोठ्या प्रमाणात पोलिस स्टेशन हद्दीत चौऱ्या होत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष कासम सुरत्ने यांनी केली आहे.
सोनाळा पोलीस ठाणे हद्दीतीलअवैध धंदे करणायांवर कार्यवाह्या सुरुच आहेत. अवैध धंदे कुठे सुरू असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे. त्यांच्यावर कारवाही करण्यात येइल
– श्रीधर गुट्टे ए.पी.आय. पोलीस स्टेशन सोनाळा