Home गडचिरोली किशोर कुड्यामीची जाादुटोण्याच्या संशयावरुन हत्या,आरोपी अटकेत।

किशोर कुड्यामीची जाादुटोण्याच्या संशयावरुन हत्या,आरोपी अटकेत।

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0004.jpg

किशोर कुड्यामीची जाादुटोण्याच्या संशयावरुन हत्या,आरोपी अटकेत।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :: जिल्हातील लाहेरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लाहेरी येथिल किशोर दोघे कुड्यामी (23) याची 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. माञ हत्यारा कोण?याबाबत तपास सुरू असतांना संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने जादुटोण्याच्या संशयावरुन हत्या केल्याचे कबुल केले आहे. राजु बोगामी असे आरोपीचे नाव असुन पोलिसांनी अटक केले आहे.भामरागड तालुक्यातील लाहेरी येथिल किशोर दोघे कुड्यामी या युवकाची 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.माञ हत्यारा मोकाट होता, पोलिसांनकडुन अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.हत्याराचा शोध घेणे सुरु होते.दरम्यान 12 ऑगस्ट रोजी गुन्हातील संशयीत राजु बोगामी यााचेकडे चौकशी केले असता त्यानेच जाादुटोण्याच्या संशयावरुन किशोर दोघे कुड्यामी यास भरमार बंदुकीतुन गोळी झाडून हत्या केल्याची कबुली दिली आहे.यावरुन 13 ऑगस्ट रोजी आरोपी राजु बोगामी यास अटक करण्यात आली असुन आरोपीस कोटात हजर करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस उप निरिक्षक महादेव भालेराव व त्यांचे पथक करत आहेत.

Previous articleमा.ना.सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभे तर्फे हार्दिक स्वागत
Next articleभारतीय जनता पार्टी,भाजपा जनजाती मोर्चा,भाजयुमो गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here