आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर बंद होणार; अमेरिकेची नावाजलेली कंपनी हिंदुस्तान इनीलिव्हर या कंपनीचे एक उत्पादन जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर हे आता बंद होणार आहे कारण या पावडर वरती अनेक दिवसापासून तक्रारी येत होत्या. या पावडरमुळे स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याचा तक्रारी अनेक दिवसापासून केल्या जात होत्या खरंतर १९९९ साली ही पावडर भारतामध्ये उपलब्ध होऊ लागली आणि घराघरात जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर वापरू जाऊ लागले. लहान मुल म्हटलं की जॉन्सन पावडर हे एकच नाव यायचं अमेरिकेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती गर्भाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण खूप आहेत. भारतातही याच्यावरती रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आहेत परंतु पुरावे नसल्याकारणाने बंदी आणण्यात येत नव्हती आता भारताकडे ठोस पुरावे असल्यामुळे ही पावडर बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .अमेरिकेने हे उत्पादन चालू राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही एकंदरीतच ही पावडर लहान मुलांसाठी तसेच स्त्रियांसाठी खूप धोकादायक आहे हे यातून स्पष्ट होत आहे.