आशाताई बच्छाव
महाआवास अभियान २.० अंतर्गत आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते सत्कार गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
१ वर्षाच्या आत घरकुल बांधणार्या लाभार्थ्याचा, घरकुल योजनची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीचा , योजनेचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
प्रत्येक गरजूला घर मिळावा यासाठी करणार प्रयत्न
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती गडचिरोलीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ज्या लोकांना घरकुल मंजूर झाले , ते घरकुल त्यांनी नियोजित कालावधीत पूर्ण केले. त्यासाठी शासन यंत्रणेतून उत्तमरीत्या काम करणारे कर्मचारी, अधिकारी व लाभार्थी हे सर्व सत्कारास पात्र असून त्यांचा सत्कार करताना आपल्याला आनंद होत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली पंचायत समिती येथील पंतप्रधान आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत महाआवास अभियान २.० या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात केले.
याप्रसंगी १ वर्षाच्या आत घरकुल बांधणार्या लाभार्थ्याचा, घरकुल योजनची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीचा व घरकुला संबंधित उत्तम काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंचावर माजी सभापती मारोतरावजी इचोडकर ,माजी उपसभापती विलासजी दशमखे, संवर्ग विकास अधिकारी श्री साळवे जी , हेमंत बोरकुटे यांचे सह प्रमुख अधिकारी उपस्थित होते
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी , प स चे माजी सभापती मारोतरावजी इचोडकर ,माजी उपसभापती विलासजी दशमुखे, यांचाही सत्कार पंचायत समिती च्या वतीने करण्यात आला.
प्रत्येक गरजूला घर मिळावे याकरिता आपण प्रयत्न करणार असून जो पर्यन्त गरिबाला घर मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी या कार्यक्रमा प्रसंगी केले. पंतप्रधान आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत महाआवास अभियान २.० या लवकरच प्रत्येक गरजूंना घर मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.