आशाताई बच्छाव
हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोफत तिरंगा ध्वज वाटप
प्रतिनिधी उमेश पाटील
महेशदादा जगताप व पल्लवी ताई जगताप यांच्यावतीने जनसंपर्क कार्यालयात मोफत तिरंगा ध्वज वाटप
पिंपळे गुरव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केलेल्या ‘हर घर तिरंगा’ आवाहनास देशभरातून अतिशय चांगला व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रीय ध्वज फडकावून ‘हर घर तिरंगा’ चळवळ मजबूत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी पिंपळे गुरव येथील सर्व प्रभागांमध्ये घरोघरी तिरंगा फडकणार.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. लक्ष्मणभाऊ जगताप, श्री. शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महेशदादा जगताप, सौ. पल्लवीताई जगताप यांनी नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे. तसेच प्रभागांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
पिंपळे गुरव मधील देशभक्त नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा याकरिता ‘एका कुटुंबासाठी एक’ या प्रमाणात मोफत ‘तिरंगा ध्वज’ अनेक जनसंपर्क कार्यालयातून होत असल्याचे दिसून येत आहे.
येथील रामकृष्ण चौकातील महेश जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात महेशदादा जगताप व पल्लवीताई जगताप यांच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे. गेली दोन दिवस प्रभागात फिरून व जनसंपर्क कार्यालयात नागरिक गर्दी करून येत असल्याचे पहावयास मिळत आहे.
यामध्ये, महिला बचत गट, संस्था, बँका, इमारती, सोसायटी, बैठी घरे, गणेश मंडळे, व्यवसायिक, दुकानदार, भाजीविक्रेते, फळविक्रेते, रिक्षा चालक, खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आदींना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे.
पिंपळे गुरव – सांगवी परिसरात ‘हर घर तिरंगा अभियान अंतर्गत भारताचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत तिरंगा ध्वज लावण्याची इच्छा आहे. अशा सर्व नागरिकांनी रामकृष्ण चौक येथील महेशदादा जगताप जनसंपर्क कार्यालयात येवून मोफत तिरंगा ध्वज घेऊन जाण्याचे आवाहन महेशदादा जगताप व पल्लवीताई जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे.